संघटना नोंदणी करत असताना अनेक ध्येय व उद्दिष्टे घेतली आहेत. ती खालील प्रमाणे आहेत.
त्यापैकी प्रामुख्याने समाजाच्या मनातील भीती नाहीशी करून वीरशैव बांधवांना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकाराची जाणीव करून देऊन चरित्र्यसंपन्न , श्रजनशील , व्यसनमुक्त , सुसंस्कृत , धर्मनिष्ट व एकसंघ समाजाची निर्मिती करणे व समाजाचे न्याय हक्क मिळवून देणे हे “शिवा” संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे.
याशिवाय संघटनेचे इतर उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
१) महाराष्ट्रातील वीरशैव समाजातील सर्व जाती व पोटजातीतील तरुणांचे संघटन करणे.
२) वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांमध्ये संघटनेच्या माध्यमातून आत्मविश्वास जागा करून वीरशैव समाजाचे राष्ट्रीय प्रवाहातील व भारतीय समाजातील अस्तित्व टिकवणे.
३)चरित्र्यसंपन्न , श्रजनशील , व्यसनमुक्त , सुसंस्कृत , धर्मनिष्ट व एकसंघ समाजाची निर्मितीसाठी प्रयत्न करणे.
४) वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कसाठी शासकीय व निमशासकीय स्तरावर प्रयत्न करून समाजाचे सामाजिक , बौद्धिक , मानसिकव राजकीय जीवनमान उंचावण्यासाठी तरुणांच्या संघटनेतून सर्वतोपरी प्रयत्न करणे.
५) वीरशैव लिंगायत समाजातील वेगवेगळ्या जाती व उपजाती उदा. लिंगायत वाणी , लिंगायत जंगम , लिंगायत गवळी , लिंगायत कोष्टी , लिंगायत कुंभार , लिंगायत चांभार , लिंगायत कनोडी , लिंगायत पानोडी , लिंगेंडर , माला जंगम , बुडगा जंगम , बेढा जंगम यांना महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या मागास्वर्गीय वर्गवारीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
६) महाराष्ट्रातील धर्मस्थळे , मंदिरे , मठ इत्यादींचे पावित्र्य ठेवण्यासाठी मदत करून त्यांचे संरक्षण व उन्नती करणे किंवा नवीन धर्मस्थळे , मंदिरे स्थापन करून त्यांची उन्नती करणे.
७) वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांचे धार्मिक , संस्कृतिक , शैक्षणिक व राजकीय प्रबोधन करून तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम व समाजप्रेम निर्माण करण्यास प्रयत्न करणे.
८)वीरशैव लिंगायत समाजाचे महाराष्ट्र व भारत पातळीवर एकसंघ समाज निर्मितिसाठी व समाजाचे संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
९) वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांवर होणार्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करून सामाजिक लढा उभा करणे व समाज
बांधवांचे संरक्षण करणे.
१०) वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांचा सोयीसाठी सामाजिक वधु-वर परिचय मेळावे , सामूहिक विवाह सोहळा , स्नेहसम्मेलने व मेळावे आयोजित करून समाजातील गोरगरीब जनतेला आधार देणे.
११) वीरशैव लिंगायत समाजातील सुशिक्षित तरुणाना व्यवसाय मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणे आणि व्यवसाय किंवा नोकरी मिळवून देण्यास मदत करून तरुणांचे भविष्य घडविण्याचा प्रयत्न करणे.
१२) वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प , योजना , शिबीर , मेळावे , चर्चासत्रे , धर्मसम्मेलने , अभियाने भरवून समाज बांधवांचे आर्थिक व मानसिक दृष्ट्या प्रबोधन व पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणे.
१३) समाजातील तरुणांना सामाजिक पाठबळ देऊन त्यांच्यातील सुप्त कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्न करणे.
१४) समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास महिलांच्या विकासासाठी प्रयत्न करून त्यासाठी शिवणकाम , वीणकाम , भरतकाम , नक्षीकाम व लघुउद्योग इत्यादी वर्ग चालविणे आणि गृहउपयोगी वस्तू तयार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेणे व राबविणे.
१५) समाजातील परंपरागत संस्कृती जपण्यासाठी व त्यास दिशा देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेणे व राबविणे.
१६) सामाजिक , राष्ट्रीय , धार्मिक एकात्मता विषयक प्रकल्प राबविणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विषयक योजना राबवून विद्याननिष्ठ व वस्तुनिष्ठ समाजनिर्मिती करून राष्ट्रप्रेमी समाज निर्माण करणे.
१७) सर्व प्रकारच्या विद्येचा प्रसार करणे , मुला-मुलींना , महिलांना , प्रौढांना , शारीरिक व संस्कृतिक शिक्षण देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे.
१८) समाजातील ग्रामीण लोकांना आरोग्य विषयक सल्ला देणे व त्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आरोग्यकेंद्रे स्थापन करणे आणि समाजातील दुर्बल लोकांसाठी सवलतीच्या दरात औषध उपचार करणे व त्यासाठी नेत्रदान , रक्तदान , शिबिरे , मेळावे भरवून समाजाचे प्रबोधन व पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणे.
१९) निराश्रित , निराधार लोकांसाठी अनाथाश्रमे , राजगृहे , स्वीकारगृहे , व्यवसाय प्रशिक्षण संस्था , वस्तीगृहे स्टेहोम्स सुरू करणे व चालविणे किंवा चालविण्यास देणे.
२०) समाज व्यवस्थेतील संस्कृतीचे जातं करून युवकांना धार्मिक प्रेम निर्माण करण्यासाठी प्रवचने , किर्तने , मेळावे , शिबीर आयोजित करणे , इत्यादी.