” आचाराने आणि विचाराने एक असणार्या , हृदयावर शिवलिंग धारण करून कपाळी भस्म लावणार्या व शिवाला (शंकराला) कुलदैवत मानणार्या , वीरशैव समाजातील अनेक जाती आणि उपजाती यांच्यातील तरुणांच्या मनातील आत्मविश्वास व स्पुलिंग जागृत करून ताठ मानेने व स्वाभिमानाने जीवन जगणार्या अधिकाराची वीरशैव समाजाला जाणीव करून देणारी संघटना आहे.”
या संघटनेत वीरशैव समाजाची व्याप्ती अतिशय व्यापक असून महात्मा बसवेश्वरांनी जाती-पातीच्या भिंती नाहीशा करून शिव संस्कृतीचा पुरस्कार करणार्या समाजाची निर्मिती करून समाजाचे पर्यायाने राष्ट्राची प्रगती करण्याचे मुख्य उद्दिष्ट “शिवा” संघटनेने स्वीकारलेले आहे. , त्यामुळे वीरशैव (लिंगायत) म्हणजे लिंगायत वाणी ( दीक्षवंत , चिलवंत व राशवंत ) , लिंगायत तेली , जंगम (माला जंगम , बेडा जंगम , बुडगा जंगम) , लिंगायत बुरूड , लिंगायत गवळी , लिंगायत कोष्टी , लिंगायत चांभार , लिंगायत ढोर , लिंगायत कॅंकय्या , लिंगायत मातंग , लिंगायत कुंभार , लिंगायत कासार , लिंगायत तांबोळी , लिंगायत कानोडी , लिंगायत पानोडी , लिंगडेर इत्यदिंसह अनेक जाती आणि उपजाती समाविष्ट आहेत.या सर्व जाती आणि उपजातींचे नाव त्यांचा व्यवसायांवरून पडलेले आहे. परंतु वरील सर्वांची संस्कृती , दैवत , राहणीमान , आचार , विचार व लिंगधारणा करण्याची पद्धती सारखीच असून सर्वजण शिवाला (शंकराला) दैवत मानत म्हणून वीरशैव ही जात नसून व्यापक दृष्टिकोन ठेवणारी शिवसंस्कृती आहे. त्यामुळे या सर्वांना संघटित कॅरणारी “शिवा” महाराष्ट्र वीरशैव युवक संघटना ही जातीय संघटना होऊच शकत नाही. तर “शिवा” संघटना ही शिव संस्कृतीची व वीरशैव समाजाची सामाजिक संघटना आहे.राहिला प्रश्न तो “शिवा” संघटानाची कोणत्या राजकीय पक्षांशी बंधिलकी आहे काय? याचे उत्तर नाही असेच आहे.परंतु वेगवेगळ्या राजकीय विचरांशी बंधिलकी असलेल्या मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो परंतु वीरशैव समाजाअंतर्गत असणार्या व्यक्तीस या संघटनेचा सभासद होता येईल. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये “शिवा” संघटनेचा संघटना म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीत प्रत्यक्ष वापर करता येणार नाही. ही संघटनेची मूळ धारणा आहे.त्यामुळे “शिवा” संघटनेस कोणीही राजकीय किंवा जातीय संघटना म्हणूंच शकत नाही.जर कोणी तसे म्हणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना वादासाठी वाद म्हणून उत्तर देण्यापेक्षा कृतीने उत्तर देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा अशी माझी विनंती आहे.लिंगायत वाणी ( दीक्षवंत , चिलवंत व राशवंत ) ,लिंगायत तेली , जंगम (माला जंगम , बेडा जंगम , बुडगा जंगम) , लिंगायत बुरूड , लिंगायत गवळी ,लिंगायत कोष्टी , लिंगायत चांभार , लिंगायत ढोर , लिंगायत कॅंकय्या , लिंगायत मातंग , लिंगायत कुंभार , लिंगायत कासार , लिंगायत तांबोळी , लिंगायत कानोडी , लिंगायत पानोडी , लिंगडेर इत्यदिंसह अनेक जाती आणि उपजाती समाविष्ट आहेत.
“शिवा” संघटनेत फक्त तरुणच काम करू शकतील काय? असाही प्रश्ना समाज बांधावापुढे पाडण्याची शक्यता आहे. परंतु तरुण या शब्दाचा अर्थ संघटनेस वयाने तरुण असण्यापेक्षा मानाने तरुण असणे असा अपेक्षित आहे. काही वेळेस वयाने तरुण असणारे मानाने प्रबळ नसतील. पण वयाने वृद्ध असूनही मानाने प्रबळ असणार्या व समाजासाठी काम करण्याची जिद्द असणार्या वयोवृद्धांनी “शिवा” संघटनेत कार्या करण्याची मुभा आहे.प्रामुख्याने “शिवा” संघटनेत तरुंनणी सक्रिय सहभागी व्हावे आणि समाजातील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तीनी आम्हाला मार्गदर्शन द्यावेत अशी नम्र विनंती आहे.
“शिवा”संघटना वीरशैव समाजाचे संघटन करून इतर समजाचा किंवा धर्माचा द्वेष करणार नाही किंवा इतरांवर अन्याय किंवा अत्याचारही करणार नाही , परंतु वीरशैव महणून आमच्यावर स्वकीय / परकीय कोणी सामाजिक अन्याय किंवा अत्याचार करत असे तर ते सहनही करणार नाही.कारण अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणाराच गुन्हेगार असतो. वीरशैव समाजचे प्रश्न सोडवण्यासाठी “शिवा”संघटना नेहमीच लोकशाही मार्गाचा अवलंब करील , परंतु आमचे न्याय हक्काचे प्रश्न वेळोवेळी प्रयत्न करून सुटत नसतील तर “शिवा”संघटना रस्त्यावर येऊन संघर्ष करायलाही मागे पुढे पाहणार नाही.या संघटनेत स्त्री-पुरूष , उच्च-निच्च , गरीब-श्रीमंत , असा कोणताही भेदभाव नाही. संघटनेचा माध्यमातून कदाचित आम्ही कुणाचे घर-संसार चलवू शकणार नाही. परंतु समाजाच्या तरुणात असणार्या कला-गुणांना व विचारांना व्यासपीठ व मदतीचा हात देऊन आत्मविश्वासाने जीवन जगणारा तरुण उभा करण्याचे काम संघटना करील. म. बसवेश्वरांनी श्रमाचे महत्व सांगितले आहे , त्यामुळे वीरशैव तरुणांना नि:स्वार्थपणे व त्यागी भावनेने काम करण्याची प्रवृत्ती निर्माण करून समाजाची मानसिकता बदलावात एक संघ समाज निर्माण करण्याचे मूळ उद्दिष्ट “शिवा”संघटनेने स्वीकारलेले आहे.
सद्दा परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे व शिक्षण बेकारीच्या अवस्थेत वीरशैव तरुण हातश् व निराश झाला आहे. त्यामुळे स्वत:चे जीवन जगण्यासाठी कुठेतरी समाजनीष्ठा बाजूला ठेवून कोणाच्या तरी बॉटला धरून गुलामगिरीसारखे जीवन जगण्याची दुरवस्था समाजाच्या वाट्याला आली आहे. यामुळे समाज मनात असुरक्षितता व भतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यायाने समाजातील तरुण हळुहळु व्यसनाधीन होऊन वीरशैव संस्कृती पासून दूरवात चालला आहे. हे दुष्ट चक्र थांबवून संघटनेच्या बळावर समाजाचा आत्मविश्वास वाढवून वीरशैव समाजाचे राष्ट्रीय प्रवाहातील व सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक , धार्मिक , राजकीय , औद्योगिक व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील वीरशैव समाजाचे मूळ धोरण आहे